Home Maharashtra News RBI कडून ‘या’ बॅंकेचा परवाना आजपासून रद्द

RBI कडून ‘या’ बॅंकेचा परवाना आजपासून रद्द

RBI

RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने राज्यातील एका बँकेवर मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने या बँकेचं थेट लायसन्सच रद्द केलं आहे. तसंच यापुढे कोणताही व्यवहार करु नये, अशी तंबी देखीव या बँकेला दिली आहे. पुरेसा निधी नसल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याचे समजते. मात्र ग्राहकांच्या हितासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचं आरबीआयने स्पष्ट केलं आहे.

आरबीआयने उत्तर महाराष्ट्रातील नाशिकच्या ‘इंडिपेंडन्स सहकारी बँकेवर’ ही कारवाई केली आहे. दरम्यान RBI ने या सहकारी बँकेचा परवानाच रद्द केला आहे. आजपासून बँकेला कोणताही व्यवहार करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे बॅंकेला गाजा गुस्ता गुंडाळायची वेळ आली आहे.

भारतातील सर्व बॅंकांवर, व्यवहारांवर आणि आर्थिक व्यवस्थेवर आरबीआय लक्ष ठेऊन असते. आरबीआय कडूनच बॅंकांना परवाने दिले जातात व काढूनही घेतले जातात. आरबीआयने घालून दिलेल्या नियमातच देशभरातील सर्व बॅंका काम करीत असतात. आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्यास अथवा जनतेच्या पैशाचा विपर्यास होईल अशी परिस्थिती उदभवण्याची शक्यता वाटल्यास आरबीआय परवाने रुद्ध करते.

Web Title : RBI cancelled Nashik based Independence co operative bank license

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here