Home पुणे आता पडणार खरी थंडी वाचा हवामान अंदाज काय आहे? Weather Update

आता पडणार खरी थंडी वाचा हवामान अंदाज काय आहे? Weather Update

Weather Update: २० तारखेपासून खरी थंडीची चाहूल सुरु होणार.

Read the real Cold Now What is the weather forecast

पुणे: दोन दिवसांपासून शहरात थंडी वाढू लागली आहे. शनिवारी (दि. १६) तर दिवसभर हवेतील गारवा खूपच वाढला. सकाळी पाषाण परिसरात १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच इतर ठिकाणीदेखील किमान तापमानात घट दिसून येत आहे. आणखी दोन दिवसांत किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

राज्यात आणि पुणे शहरात गारठा वाढला आहे. येत्या आठवड्यात राज्यात हवामान कोरडे राहणार असून, १७ डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. सध्या राज्याच्या किमान तापमानात मोठी घट होत आहे. विदर्भासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या किमान तापमानात घट झाली आहे. त्यामुळे राज्यात गारठा वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा १२ अंशांच्या खाली आला आहे. रविवारी (दि. १७) महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सध्या अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळली आहे. नैऋत्य बंगालच्या उपसागरात विषुववृत्ताजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी पहाटेच्या वेळी गारठा वाढलेला जाणवत आहे. दरम्यान, रविवारी (दि. १७) रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

श्रीलंकेवर चक्रवाताची स्थिती निर्माण झाल्याने ते वारे मध्य महाराष्ट्रात वाहू शकते. त्यामुळे पुढील ७२ तासांत पहाटे धुके पडेल. तसेच किमान तापमानात घट होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

पंजाबरावांनी आज आणि उद्या अर्थातच 18 आणि 19 डिसेंबर 2023 रोजी राज्यात ढगाळ वातावरण राहणार आणि काही भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज दिला आहे.

पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यातील मध्य महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज आहे.

राज्यातील सोलापूर, लातूर, परभणी, छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यात ढगाळ हवामानाची शक्यता असेल असा अंदाज दिला आहे.तर सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असे सांगितले जात आहे.

मात्र हा पाऊस सर्व दूर पडणार नाही. सोलापूर जिल्ह्यातील काही भागात, अगदी तुरळक ठिकाणी किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडेल असे सांगितले गेले आहे.

तसेच 20 डिसेंबर 2023 पासून पुन्हा एकदा राज्यात थँडीचा जोर वाढेल असे देखील त्यांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात स्पष्ट केले आहे.

Web Title: Read the real Cold Now What is the weather forecast

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here