Home अहमदनगर रेखा जरे हत्याकांड; साक्षीदाराला जीवे मारण्याची धमकी

रेखा जरे हत्याकांड; साक्षीदाराला जीवे मारण्याची धमकी

Breaking News | Ahmednagar:  ‘तू रेखा जरे हत्याकांडातील सरकारी साक्षीदार असून, तू आमच्या बाजूने साक्ष दे. जर तू आमच्या बाजूने साक्ष दिली नाहीस तर तुला ट्रकने उडवू’.

Rekha Jare massacre Threat to kill witness

अहमदनगर :  गेल्या तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या रेखा जरे हत्याकांडातले सरकारी साक्षीदार डॉ. विजय मकासरे यांना बुलेटवरुन आलेल्या दोघा अज्ञात इसमांनी जीवे मारण्याची धमकी दिली.

 रेखा जरे हत्याकांडातील सरकारी साक्षीदार डॉ. विजय अण्णासाहेब मकासरे (वय ४०, रा. वळण, ता. राहुरी) यांना रविवारी (६ ऑक्टोबर) सकाळी साडेनऊ वाजता चारचाकी गाडीने जाताना शेंडी बाह्यवळण ते एमआयडीसी मार्गावर एका बिगर नंबरच्या दुचाकीवर हेल्मेट घालून आलेल्या अज्ञात दोघांनी जीवे मारण्याची धमकी दिली.

फिर्यादीनुसार, ‘तू रेखा जरे हत्याकांडातील सरकारी साक्षीदार असून, तू आमच्या बाजूने साक्ष दे. जर तू आमच्या बाजूने साक्ष दिली नाहीस तर तुला ट्रकने उडवू’ अशी धमकी दिली. यासंदर्भात एमआयडीसी पोलिस ठाण्यात मकासरे यांनी तक्रार दिली.

Web Title: Rekha Jare massacre Threat to kill witness

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here