Home अहमदनगर संगमनेरात अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार

संगमनेरात अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार

Breaking News | Sangamner Crime: एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी शारीरिक अत्याचार (abuse) करण्यात आल्याची घटना.

Repeated abuse of minor girl in Sangamner

संगमनेर: एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी शारीरिक अत्याचार करण्यात आल्याची घटना संगमनेर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे.  अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणावर मंगळवारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे

विशाल संपत बोऱ्हाडे (रा. माधवनगर, राजापूर रस्ता, संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिडीत मुलीची आई मजुरी करून उदरनिर्वाह करते. १७  वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाचा विशाल बोऱ्हाडे  याने गैरफायदा घेतला. मुलीला त्याच्या घरी घेऊन जात त्याने तिच्यावर वेळोवेळी बळजबरीने शारीरिक अत्याचार केले. ४ जून संध्याकाळी ते १० जून या कालावधीत तसेच यापूर्वीही दोन-तीन वेळा बोऱ्हाडे याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले, असेही फिर्यादीत म्हटले आहे. त्याच्याविरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कलम ४, ६ प्रमाणे तसेच अत्याचाराचा गुन्हा पोलिसांनी नोंदवून घेतला.

याप्रकरणी शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विश्वास भान्सी हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Repeated abuse of minor girl in Sangamner

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here