Home Ahmednagar Live News अहमदनगर: दरोडा पडला, तरुणाची निर्घृणपणे हत्या,  मोठी रक्कम चोरीस

अहमदनगर: दरोडा पडला, तरुणाची निर्घृणपणे हत्या,  मोठी रक्कम चोरीस

Ahmednagar | Shrirampur News:  दरोडा पडला, यात विवाहित तरुणाची दरोडेखोरांनी निर्घृणपणे हत्या (Murder) केली तर पत्नीला जबर मारहाण करून घरातील मोठी रक्कम घेऊन पोबारा.

robbery took place, a young man was brutally murder, a large sum of money was stolen

श्रीरामपूर: तालुक्यातील एकलहरे कार्यक्षेत्रातील एकलहरे-बेलापूर रस्त्यावर गुरुवारी रात्री 2 च्या सुमारास दरोडा पडला असून यात विवाहित तरुणाची दरोडेखोरांनी निर्घृणपणे हत्या केली तर पत्नीला जबर मारहाण करून घरातील मोठी रक्कम घेऊन पोबारा केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, एकलहरे-बेलापूर रस्तावर नईम रशीद पठाण यांची शेतवस्ती असून तेथे नईम आपल्या पत्नीसह राहत आहे. आज गुरुवारी 1 ते 2 च्या सुमारास नईम याची पत्नी लघुशंकेला घराबाहेरील स्वच्छतागृहात जाण्यासाठी घरातील दार उघडताच बाहेर टक लावून असलेले 4 पुरुष 1 महिला दरोडेखोरांनी नईम याच्या पत्नीला फरफटत घरात आणून जबर मारहाण करायला सुरुवात केली. आरडाओरडा होताच नईमने दरोडेखोर घरात आल्याचे पाहिले. तोपर्यंत लगेचच दरोडेखोरांनी नईमला घरातील लहान बाळांची झोकेची ओढणी गळ्याला बांधून निर्घृणपणे हत्या केली व घरातील मोठी रक्कम दरोडेखोरांनी घेऊन पोबारा केला आहे.

घटनेची माहिती जखमी पत्नी बुशरा हिने एकलहरे गावातील वास्तव्यास असलेल्या आपल्या वडिलांना देताच गावांतील सरपंच पतीसह घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली होती. सरपंच पती अनिस शेख यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलीस यंत्रणेकडून कसून तपास चालू आहे.

नईम पठाण याचा बेलापूर येथे बॅटरीचा व्यवसाय आहे. जागेचा व्यवहारासाठी काल नईमने 5 ते 6 लाख रुपये घरात आणले होते. याची सखोल माहिती दरोडेखोरांना मिळाली असल्याने संपुर्ण नियोजनपूर्व सदर दरोडा दरोडेखोरांनी टाकला आहे. तसेच दरोडेखोर हे स्थानिक असल्याचा संशय असून मृत नईमने दरोडेखोरांना ओळखले असल्यानेच नईमची निर्घृणपणे हत्या केल्याचे घटनास्थळी बोलले जात आहे.

Web Title: robbery took place, a young man was brutally murder, a large sum of money was stolen

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here