आठ वर्षाच्या मुलाच्या हातात बैलाला बांधलेली दोरी अडकली अन मुलाचा मृत्यू
Breaking News Pune: अंगावर काटा आणणारी आणि शोकाकुल करणारी ही घटना! अंगणात खेळणाऱ्या आठ वर्षाच्या मुलाच्या हातात बैलाला बांधलेली दोरी अडकली आणि मुलगा फरफटत गेला. या घटनेत आठ वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना.
पुणे : हवेली तालुक्यातील फुलगाव गावाला अंगावर काटा आणणारी आणि शोकाकुल करणारी ही घटना! अंगणात खेळणाऱ्या आठ वर्षाच्या मुलाच्या हातात बैलाला बांधलेली दोरी अडकली आणि मुलगा फरफटत गेला. या घटनेत आठ वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
शौर्य शैलेश वागस्कर असे या आठ वर्षीय दुर्दैवी चिमुकल्याचे नाव आहे. सोमवारी संध्याकाळच्या वेळी ही घटना घडली. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी शौर्य हा अंगणात खेळत होता त्याने बैलाला बांधलेली दोरी हातात घेतली आणि ओढली त्यामुळे बैल घाबरला आणि तो धावत सुटला.
अचानक काही घडायच्या आत या दोरीचा शौर्याच्या गळ्याभोवती फास बसला आणि बैल जसा पळत होता तसाच तो फरपटत गेला. काही अंतरापर्यंत त्याला बैलाने तसेच फरफटच नेल्याने तो गंभीर जखमी झाला. पालक धावत आले, परंतु उशीर झाला होता. या घटने प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
Web Title: rope tied to a bull stuck in the hand of an eight-year-old boy and the boy died
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study