Home अहमदनगर अहमदनगरमध्ये गुंडांचं राज्य सुरू झालंय – संजय राऊत

अहमदनगरमध्ये गुंडांचं राज्य सुरू झालंय – संजय राऊत

Breaking News | Sanjay Raut Ahmednagar:  आमच्याकडे पक्ष नाही चिन्ह नाही. काय म्हणून आम्हाला सोबत घेतील, असा उपरोधिक टोला शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला.

rule of gangsters has started in Ahmednagar - Sanjay Raut

अहमदनगर: अहमदनगरमध्ये गुंडांचं राज्य सुरू झालंय – संजय राऊत या शहरातील आमदार असेल की खासदार, कुणी कुणाचा व्याही असो की साडू असो सर्वांची गुंडगिरी मोडून काढू… नाव न घेता कर्डीले-जगताप यांच्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे.

भाजपवाल्यांना काही साक्षात्कार झालाय का? आमच्याकडे पक्ष नाही चिन्ह नाही. काय म्हणून आम्हाला सोबत घेतील, असा उपरोधिक टोला शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला आहे. शनिवारी संजय राऊतांना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वंजारवाडी येथे समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बातचीत करताना राऊत बोलत होते. याप्रसंगी माजी मंत्री शंकरराव गडाख उपस्थित होते.

नेवासा येथील संत वामनभाऊ आणि संत भगवानबाबा प्रतिष्ठानच्या वतीने संजय राऊत यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना देखील आमंत्रित करण्यात आलं होते. मात्र ते अनुपस्थित राहिले. यावेळी मराठा आरक्षणावर बोलताना त्यांनी सांगितले की, आजच निर्णय झाला. त्यांना आनंद घेऊ द्या. काही त्रुटी असतील तर नंतर बोलता येईल. मात्र राज्यातील एखादी समस्या सुटली असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे.

नितीश कुमार आमच्या दारात उभे राहिले तरी त्यांना भाजप सोबत घेणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपने त्यांनी दिली होती, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्याला उत्तर देताना राऊतांनी म्हटले की, पलटूराम फक्त नितीश कुमार नाहीत. तर पहिले पलटूराम भाजप आहे. नितीश कुमार आमच्या दारात उभे राहिले तरी त्यांना भाजपमध्ये घेणार नाही, अशी भाजप नेत्यांची वक्तव्य होती. मात्र आज काय घडतंय हे आपल्यासमोर असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.

Web Title: rule of gangsters has started in Ahmednagar – Sanjay Raut

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here