धक्कादायक! पोलिस कर्मचाऱ्यासह सख्ख्या भावाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Crime News: सख्ख्या भावासह नात्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Rape) केल्याची घटना. आरोपी भावाला अटक करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर: गंगापूर तालुक्यात सख्ख्या भावासह नात्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पिडीत मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. तर, या प्रकरणी दोघांवर पॉक्सो कायद्यांतर्गत गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष होनाजी गांगुर्डे असे आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर यातील आरोपी भावाला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,, छत्रपती संभाजीनगर गंगापूर शहरातील पीडितेच्या सख्ख्या भावाने पीडितेला जीवे मारण्याची धमकी देत शेतात व राहत असलेल्या घरी वेळोवेळी अत्याचार केला. तसेच, ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेला पोहेकॉ सुभाष होनाजी गांगुर्डे याने देखील नात्यातील या अल्पवयीन मुलीवर तिच्या राहत्या घरी, घरात कोणी नसताना सहा महिन्यांपूर्वी बलात्कार केला. त्यामुळे, या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून तिचा सख्खा भाऊ तसेच नातेवाईक पोहेकॉ. सुभाष होनाजी गांगुर्डे विरोधात पॉक्सो व विविध कलमांतर्गत शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सुरवातीला या प्रकरणात पिडीत तरुणीच्या भावावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, या प्रकरणात आणखी एक गुन्हेगार असून, तो पोलिस खात्यात असल्याने, पिडीत मुलीला त्याचे नाव सांगण्याची हिंमत झाली नाही. परंतु, पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी पीडितेला धीर देत अधिक माहिती घेतली. यावेळी तिने नातेवाईक असलेल्या आरोपी पोलीस कर्मचारी गांगुर्डेनेही वेळोवेळी आपल्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक खुलासा केला. त्यामुळे पोलिसांनी तिचा पुन्हा जबाब आरोपी गांगुर्डेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Sakhkhya’s brother along with a policeman Rape a minor girl
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App