संगमनेर: सक्ख्या भावाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या
Sangamner News: भावाच्या त्रासाला कंटाळून भावाने घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.
संगमनेर : भावाच्या त्रासाला कंटाळून भावाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.१७) दुपारी ३ वाजेच्या सुमारास तालुक्यातील रहीमपूर येथे उघडकीस आली.
ज्ञानदेव देवराम जोर्वेकर (वय ५०) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तुकाराम देवराम जोर्वेकर (रा. रहीमपूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध मृत ज्ञानदेव जोर्वेकर यांच्या पत्नी अनिता ऊर्फ अन्नपूर्णा ज्ञानदेव जोर्वेकर (रा. जोर्वेकर वीटभट्टी, जुने रहीमपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. वडिलोपार्जित मालमत्तेच्या वाटणीत तुकाराम जोर्वेकर याने घरामध्ये हिस्सा, शेती अवजारे अशा कोणत्याच वस्तू दिल्या नाहीत. तसेच ज्ञानदेव जोर्वेकर यांना व त्यांच्या मुलाला वर्षभरापूर्वी शेतात शिवीगाळ करत मारहाण केली होती.
Web Title: Sakhya commits suicide after suffering from her brother
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App