संदीप मिटके पुन्हा अहमदनगरमध्ये, आर्थिक गुन्हे शाखेचे नवे उपअधीक्षक
Breaking News | Ahmednagar: आर्थिक गुन्हे शाखेचे नवे उपअधीक्षक संदीप मिटके.
अहमदनगर : शिर्डी उपविभागाचे पोलिस अधीक्षक मिटके आर्थिक उप संदीप यांची गुन्हे शाखेत नेमणूक करण्यात आली आहे. ते आज, मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेचा पदभार स्वीकारणार आहेत. मिटके यांची शिर्डी येथून नाशिक शहरात सहायक पोलीस आयुक्तपदी बदली झाली होती. तेथून त्यांची बदली आता आर्थिक गुन्हे शाखेत झाली आहे.
आधीचे पोलिस उपअधीक्षक कमलाकर जाधव यांची नाशिकला बदली झाली होती. त्यामुळे गृह शाखेचे उपअधीक्षक हरीष खेडकर यांच्याकडे आर्थिक शाखेचा अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला होता. सोलापूर येथील संजय बांबळे यांची आर्थिक गुन्हे शाखेत नेमणूक झाली होती, तसा आदेशही निघाला होता, मात्र सोमवारी रात्री पोलिस उपअधीक्षक मिटके यांच्या नियुक्तीचा आदेश निघाला. मिटके आज पदभार घेणार आहेत. त्यांच्यासमोर नगर अर्बन बँक कर्ज घोटाळ्याच्या तपासाचे मोठे आव्हान असणार आहे. नगर अर्बन बँकेच्या घोटाळ्यातील आरोपींना अटक केली जात नसल्याने न्यायालयाने पोलिसांना सोमवारी दुसऱ्यांदा फटकारले आहे.
मिटके यांनी अहमदनगर शहर, श्रीरामपूर तसेच शिर्डी येथे यापूर्वी काम पाहिलेले आहे. नगर जिल्ह्यातील अनेक गुन्ह्यांचा तपास तसेच नगर शहरातील महत्त्वाचा मानला जाणारा मोहर्रम बंदोबस्त, गणेशोत्सव, त्यांनी चोखपणे पार पाडलेला आहे. श्रीरामपूर येथे असताना दिग्रस येथील गोळीबार घटनेची परीस्थिती अत्यंत कुशलतेने त्यांनी हाताळली, तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी वेश्याव्यवसाय चालणाऱ्या ठिकाणी छापा टाकून अनेक पीडितांची सुटका त्यांनी केली असून श्रीरामपूरातील मुल्ला कटर टोळीविरुद्ध मोक्का लावून त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यात आला. त्यांचे नगर जिल्ह्यातील काम हे उल्लेखनीय ठरलेले आहे. मिटके यांच्या आर्थिक गुन्हे शाखेतील बदलीने जिल्ह्यातून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
Web Title: Sandeep Mitke is back in Ahmednagar, the new Deputy Superintendent
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study