Home Sangamner News संगमनेरातील घटना: शेततळ्यात बुडून १५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

संगमनेरातील घटना: शेततळ्यात बुडून १५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Sangamner 15-year-old boy drowns in farm

Ahmednagar News Live | Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकुरजवळील चिंचेवाडी येथे एका १५ वर्षीय मुलाचा शेततळ्यात बुडून (drowns) मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संकेत तावजी बिचकुले वय १५ असे मृत मुलाचे नाव आहे. संकेत बीचकुले हा शेत तळ्यात पडला. तो पडल्याचे समजताच त्याला बाहेर काढत घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल आर. व्ही, भूतांबरे अधिक तपास करीत आहे.

Web Title: Sangamner 15-year-old boy drowns in farm

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here