संगमनेर शहरात किरकोळ कारणावरून एकास भोकसले
संगमनेर | Sangamner: संगमनेर शहरातील मदिनानगर परिसरात किरकोळ कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याने एकास चाकूचा हल्ला करीत भोकसले आहे.
यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तीन जणांना अटक केली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मदिनानगर परिसरातील गल्ली नंबर १ मध्ये गुरुवारी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास साहिल व अर्शद हे त्यांच्या घराच्या ओट्यावर गप्पा मारत बसलेले असताना आरोपी फैजल शेख, अब्रार शेख, इम्रान शेख हे तेथे येऊन तुम औरातोंको देखकर क्यू चील्लाते हो? यहा बैठने की जगह है क्या? असे म्हणत तेथे बसलेल्या तरुणांना दमबाजी केली. यावेळी साहिल राशीद मानियार याने आम्ही ३१ डिसेंबर असल्याने गप्पा मारीत बसलो आहोत. आम्ही महिलांकडे पाहून ओरडत नाही असे सांगितले. यावेळी साहिल व त्याचा मित्र अर्शद यांना शिवीगाळ करत मारहाण केली. या भांडणात एकाने साहिल मणियार याच्या पोटात चाकू भोकसून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरडाओरडा झाल्याने शेजारील लोक धावून येत भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला. साहिल यास नातेवाईक यांनी उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र साहिलची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला नाशिक येथे हलविण्यात आले.
याप्रकरणी साहिल मणियार याचा भाऊ सोहेल रशीद मणियार याने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून अब्रार राउफ शेख, इम्रान राउफ शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. संगमनेर पोलिसांनी या दोघांना अटक केली असून न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
Web Title: Sangamner a man was stabbed for a minor reason