Home संगमनेर संगमनेर: कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

संगमनेर: कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Breaking News | Sangamner: कारने पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना.

Sangamner Accident Bike rider killed in car collision

संगमनेर: जुन्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खांडगाव फाटा येथे कारने पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांत बुधवारी (दि, २९ मे) गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  गणेश दत्तात्रय मधे हा दुचाकीवरून (क्र. एमएच. १७, एआर. २०२८) जात असताना खांडगाव फाटा येथे आला असता पाठीमागून येणाऱ्या स्वीफ्ट कारने (क्र. एमएच.०४, बीटी. ५३००) जोराची धडक दिली. यामध्ये मधे गंभीर जखमी होऊन ठार झाला. अपघातानंतर जखमीला मदत करण्याऐवजी कारचालक अशोक दत्तात्रय कर्पे (रा. पिंपळगाव कोंझिरा, ता. संगमनेर) हा निघून गेला. या अपघातात दोन्ही वाहनांचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी मयताचा भाऊ धनंजय दत्तात्रय मधे (मूळ रा. पिंपळगाव माथा, ता. संगमनेर, हल्ली रा. कोल्हार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारचालक अशोक कर्पे याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहायक पोलीस निरीक्षक फडोळ करत आहेत.

Web Title: Sangamner Accident Bike rider killed in car collision

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here