Home संगमनेर संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर इनोव्हा कार व आयशर यांच्यात भीषण अपघात

संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर इनोव्हा कार व आयशर यांच्यात भीषण अपघात

Sangamner Accident Inova ayashar tempo

संगमनेर: तालुक्यात नाशिक पुणे हायवेवर इनोव्हा कार व आयशर यांचा अपघात आज शुक्रवारी दि. २५ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात कारमधील दोघे जण जखमी झाले आहेत.

तालुक्यात पुणे ते नाशिक जाणाऱ्या लेन वर हॉटेल साई प्रसाद पासून तीनशे मीटर अंतरावर नाशिकचे दिशेला चंदनापुरी  घाट येथे एक इनोव्हा कार (क्रमांक MH05 DX63 64) ही समोर चाललेल्या आयशर क्रमांक (MH 15 FV 09 51) याला पाठीमागून जोराची धडक देऊन अपघात झाला. या अपघातात इनोव्हा कार चालक नामे राजाराम नारायण म्हात्रे वय 57 राहणार बदलापूर जिल्हा ठाणे व राजेंद्र तुकाराम झुंजरराव वय 51 राहणार बदलापूर हे दोघे जखमी झाले आहेत. तर अन्य दोघे जण किरकोळ जखमी झाले आहे. महामार्ग  पोलिसांनी गाडीत अडकलेल्या जखमींना बाहेर काढून वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. जखमींना तांबे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच रस्त्यावरील दोन्ही वाहने रस्त्याला बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली आहे. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेबाबत संगमनेर पोलिसांना माहिती कळविण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक शिंदे हे करीत आहेत.

Web Title: Sangamner Accident Inova ayashar tempo

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here