संगमनेर ब्रेकिंग: एस.टी बस पलटी, बसचा एक्सल तुटल्याने बस…..
Sangamner Accident News: पिंपरणे गावाजवळ एस.टी. बस पलटी झाल्याची घटना घडली.
संगमनेर: संगमनेर तालुक्यात पिंपरणे गावाजवळ एस.टी. बस पलटी झाल्याची घटना घडली आहे. संगमनेर ते कोळेवाडी मुक्कामी असलेली आणि संगमनेरला निघालेली बस आश्वि, शिबलापूर मार्गे संगमनेरकडे येत असताना पिंपरणे याठिकाणी बसचा एक्सल तुटल्याने नियंत्रण सुटून कोसळून बस पलटी झाल्याची घटना घडली. बस मधले सर्व विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी संगमनेर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी एस टी महामंडळाची बस (क्र एम एच 07 सी 9146) कोळेवाडी कडून संगमनेर कडे यायला निघाली बस आश्वि, शिबलापूर मार्गे संगमनेरकडे येत असताना अनेक विद्यार्थी शहरात शिकण्यासाठी येत असताना, बस तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपरणे गावामध्ये आली असता, बसचा एक्सेल तुटल्यामुळे बस पलटी झाली आहे. सदर बसने मुख्यत्वे करून विद्यार्थी प्रवास करत होते.
काही विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. संगमनेर पोलीस घटनास्थळी असून, स्थानिक नागरिक देखील मदतीसाठी हजर आहेत. किरकोळ जखमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी संगमनेरला पाठवलेले आहे. पालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. पोलीस प्रशासन पुढील तपास करत आहे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, यांनी केले आहे.
Web Title: Sangamner Accident News ST Bus overturned
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App