Home Accident News संगमनेर ब्रेकिंग: पायी जात असलेल्या एकास कारने उडविले, धडकेत जागीच ठार

संगमनेर ब्रेकिंग: पायी जात असलेल्या एकास कारने उडविले, धडकेत जागीच ठार

Sangamner Accident pedestrian was hit by a car and killed on the spot

संगमनेर | Accident: भरधाव वेगाने आत असलेल्या कारणने रस्ता ओलांडत असलेल्या पायी जाणाऱ्या व्यक्तीस धडक दिल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना आज रविवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास घडली. नाशिक पुणे महामार्गावार संगमनेर तालुक्यातील बोटा शिवारात हा अपघात घडला. महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

गोविंद लुमा मधे वय ६५ रा. खळमाळ, बोटा असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मधे हे बोटा येथील गावंदरा ओढ्याकडे अंघोळीसाठी जात असताना याचदरम्यान नाशिककडून पुणे येथे जाणाऱ्या कारने (एम,एच. १५ एच.क़्यु. ४०४७) जोराची धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली.

याप्रकरणी कार चालक त्रिंबक नामदेव सानप रा. श्रमिक नगर सातपूर रोड नाशिक याच्याविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल कैलास देशमुख करीत आहे.    

महत्वाचे: संगमनेर अकोले न्यूज नवीन सुपर फास्ट स्वरूपात आजच आपला  अॅप येथून अपडेट करा.   संगमनेर अकोले न्यूज 

Web Title: Sangamner Accident pedestrian was hit by a car and killed on the spot

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here