संगमनेर: आंबे घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकअपला अपघात, एक जखमी, प्रचंड नुकसान
संगमनेर | Accident: संगमनेर तालुक्यातील माहुली घाटात गुजरातहून नाशिक पुणे महामार्गाने पुणे येथे आंबा घेऊन जाणारा बोलेरो पिकअपचा अपघात झाला. या अपघातात चालक जखमी झाला आहे. तसेच वाहनाचे व आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली.
संगमनेर तालुक्यातील माहुली घाटात तीव्र वळणे आहेत. त्यामुळे वाहन चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुर्तून अपघात झालेले आहेत. आज सकाळी महामार्गाने आंबा घेऊन जाणारी बोलेरो पिकअप (एम.एच. १४ जे.एल.०३८७) माहुली घाटात आली असता चालक मनोज गोविंद साठे यास घाटातील वळणाचा अंदाज न आल्याने पिकअप वरील नियंत्रण सुटल्याने पिकअप महामार्गावर उलटली. यामध्ये चालक मनोज किरकोळ जखमी झाला आहे. आंबे महामार्गालगत पडल्याने आंब्याचे व वाहनाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
या अपघाताची माहिती समजताच महामार्ग पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नारायण ढोकरे, विशाल कर्पे, भरत गांजवे आदींनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
Web Title: Sangamner Accident to a bolero pickup