संगमनेर- अकोलेत ३१ महिला होणार पोलिस पाटील !
Sangamner Akole News: सोडतीत काही गावांमध्ये सर्वसाधारण व्यक्तींना प्राधान्य न मिळता विविध जाती जमातींसह महिलांना प्राधान्य मिळाल्याने पाटील होण्याची वाट पाहणाऱ्या अनेक तरुणांचा मात्र चांगलाच हिरमोड.
संगमनेर : संगमनेर व अकोले तालुक्यात १५१ गावांच्या पोलिस पाटलांच्या आर- क्षणाची सोडत चिठ्ठी काढून करण्यात आली. सोडतीत काही गावांमध्ये सर्वसाधारण व्यक्तींना प्राधान्य न मिळता विविध जाती जमातींसह महिलांना प्राधान्य मिळाल्याने पाटील होण्याची वाट पाहणाऱ्या अनेक तरुणांचा मात्र चांगलाच हिरमोड झाला.
संगमनेर, अकोले तालुक्यात ३१ महिला पोलिस पाटील होणार आहेत. शासनाच्या धोरणानुसार महिलांना पोलिस पाटील आरक्षण सोडतीमध्ये ३० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या. यामुळे आता संगमनेरात २३ तर अकोले तालुक्यातील ८ अशा दोन्ही तालुक्यात ३१ गावांमध्ये महिला पोलिस पाटील कारभार पाहणार आहेत. दोन तालुक्यांच्या ग्रामीण भागात कायदा सुव्यवस्था जाणार राखण्याचे काम महिला पोलिस पाटील ग्रामीण पाहणार आहेत!
संगमनेर व अकोले तालुक्यातील पोलिस पाटलांच्या रिक्त जागांवर भरती प्रक्रिया अनेक दिवसांपासून रखडली याबाबत शासनाकडे पाठपुरावा करूनसुद्धा मुहूर्त निघत नव्हता. शासनाकडून अखेर या भरतीला ग्रीन सिग्नल मिळाला. यामुळे संगमनेरात ७४ तर अकोले तालुक्यात ७७ अशी एकूण १५१ पोलिस पाटलांची पदे भरली आहेत. आता खऱ्या अथनि भागात पदे रिक्त गावांना पोलिस पाटील मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संगमनेर येथे यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनातील सभागृहात तालुक्यातील ७४ तर अकोलेतील ७७ अशा एकूण १५१ गावांच्या रिक्त पोलिस पाटील पदांसाठी उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, पोलिस सोमनाथ वाकचौरे, तहसीलदार धिरज मांजरे, अकोलेचे सतिश थेटे यांच्या उपस्थितीत मुलाच्या हस्ते चिट्ठी काढून सोडत जाहीर करण्यात आली आहे. शासनाच्या धोरणानुसार महिलांना ३० टक्के जागा मिळाल्या आहेत.
Web Title: Sangamner-Akole will have 31 women Police Patil
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App