Home अकोले संगमनेरात दुपारी ३ वाजेपर्यंत “किती” टक्के मतदान 

संगमनेरात दुपारी ३ वाजेपर्यंत “किती” टक्के मतदान 

Sangamner Assembly Election 2024:  दरम्यान दुपारी ३ वाजेपर्यंत ७६ हजार ९३२ पुरूष मतदारांनी व ६९ हजार ४०४ स्त्री मतदारांनी असे एकूण १ लाख ४६ हजार ३३६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

Sangamner Assembly Election 2024 voting Percentage

संगमनेर: सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्ष महाविकास आघाडीसाठी निकराची तितकीच अटीतटीची राजकीय लढाई ठरलेल्या महाराष्ट्राच्या पंधराव्या विधानसभा निवडणुकीसाठी आज, बुधवारी मतदान होत आहे. देशातील आघाडीचे राज्य असलेल्या महाराष्ट्राची सूत्रे पुढील पाच वर्षासाठी कोणत्या राजकीय आघाडीकडे सोपवयाची याचा फैसला राज्यातील जवळपास साडेनऊ कोटीहून अधिक मतदार आज करणार आहेत.

महायुती, महाविकास आघाडी आणि छोट्यामोठ्या राजकीय पक्षांची कसोटी पाहणाऱ्या या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची याशिवाय त्यांच्या राजकीय वारसदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून राज्यभरात एकाचवेळी मतदानाला सुरुवात झाली आहे.

संगमनेर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात नवव्यांदा निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहे. तसेच महायुतीकडून अमोल खताळ निवडणूकीच्या रिंगणात आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. अतिशय शांततेत मतदान पार पडत आहे. तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला. मतदान केंद्रावर मोबाईलवर मनाई करण्यात आली असून गेटवरच मोबाईल जमा केले जात आहे.

संगमनेर विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ८९ हजार १७४ मतदार आहे. यामध्ये १ लाख ४८ हजार २८४ पुरूष मतदार व १ लाख ४० हजार ८८९ स्त्री मतदार आहेत. दरम्यान दुपारी ३ वाजेपर्यंत ७६ हजार ९३२ पुरूष मतदारांनी व ६९ हजार ४०४ स्त्री मतदारांनी असे एकूण १ लाख ४६ हजार ३३६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. जवळपास तालुक्यात ५० टक्के मतदान झाले आहे.

तसेच साकूरमध्ये ६८ टक्के मतदान झाले असून एकूण ६८५९ मतदानापैकी ४ हजार ७३१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

तसेच संगमनेर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार बाळासाहेब थोरात यांनी जोर्वे येथे मतदानाचा हक्क बजावला. तसेच मतदारांनी मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. साकूरसह परिसरातील गावांमध्ये अतिशय शांततेत मतदान पार पडत आहे. कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही.

दरम्यान अकोले तालुक्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ५३.८७ टक्के मतदान झाल्याची आकडेवारी समोर येत आहे. अकोले तालुक्यात बहुरंगी लढत होत आहे. 

येथे नोंदवा आपले मत 

https://www.youtube.com/post/UgkxWIB-uVj9T20pCEbhT3UpWC38wtSS2HXp

 

Web Title: Sangamner Assembly Election 2024 voting Percentage

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here