संगमनेरातील घटना: मतीमंद बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न, बालिकेला मारहाण
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील पठार भागात मंगळवारी १० वर्षीय मतीमंद बालिकेवर मारहाण करीत तिच्यावर अत्याचार करणाऱ्याचा प्रयत्न करणाऱ्या ५५ वर्षीय व्यक्तीला कुटुंबातील व्यक्तींनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या दत्तू पंढरीनाथ डोळझाके वय ५५ रा. हिवरगाव पठार ता. संगमनेर याच्याविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात पिडीत बालिकेच्या मामाने फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
याबाबत माहिती अशी की, १० वर्षीय बालिका व तिची आई मतीमंद असल्याने काही वर्षापासून संगमनेर तालुक्यातील पठार भागात एका गावात आजोळी राहतात. मंगळवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास बालिका घरात दिसून न आल्याने तिचा मामा व कुटुंबातील सदस्यांनी तिचा शोध सुरु केला. तिचा शोध घेत असताना घरापासून काही अंतरावर एका शेतात दत्तू डोळझाके तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांना दिसून आले. तो तेथून पळून जात असताना त्याला पकडण्यात आले. याबाबत गावाच्या पोलीस पाटील याना कळविण्यात आले. त्यानी याबाबत माहिती पोलिसांना दिली. ही माहिती समजताच पोलीस घटनास्थळी येऊन डोळझाके याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या बालिकेच्या अंगावर मारल्याचे वळ उठले असून दत्तूने मतीमंद मुलीला मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. बुधवारी न्यायालयात हजर केले असता २८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. अधिक तपास उप विभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने करीत आहे.
Web Title: Sangamner Attempt to torture a mentally retarded girl