Home संगमनेर Accident | संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर कार आणि पिकअपचा अपघात  

Accident | संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर कार आणि पिकअपचा अपघात  

Sangamner Car and pickup accident on Nashik-Pune highway

Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पठार भागातील पुणे नाशिक महामार्गावर बोटा गावाच्या शिवारात कार आणि पिकअपचा अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. सोमवार दिनांक १३ जुन रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.  

याबाबत अधिक माहिती अशी की, सिद्धेश भाऊसाहेब जाधव(रा.जाधववाडी,बोरी ता- जुन्नर) हा त्याच्या ताब्यातील पिक अप (क्रमांक एम एच १४ जे एल ६६५२) ही महामार्ग ओलांडून बोटा गावाकडे जात असताना प्रमोद कुमार मारुती जाधव (रा.ओतूर) हे त्यांच्या ताब्यातील कार (क्रमांक एम एच १२  एल जे ७१९०) ही घेऊन संगमनेर कडून आळेफाट्याच्या दिशेने जात असताना बोटा गावचे शिवारात सोमवारी सकाळी साडे दहा वाजेच्या दरम्यान आले असता रस्ता ओलांडणाऱ्या पिक अपला जोरदार धडक दिली. यामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले. केवळ दैव बलवत्तर असल्याने ते बालंबाल बचावले .

या घटनेची माहिती समजताच डोळासणे महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी सहकार्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहणे महामार्गाच्या बाजूला घेतले.व वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू केली.

Web Title: Sangamner Car and pickup accident on Nashik-Pune highway

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here