संगमनेर: तुमची सत्ता आली म्हणून माजले का? असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ
Sangamner Crime: तुमची सत्ता आली म्हणून माजले का? असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करून अज्ञात सात ते आठ तरुणांनी तीन जणांना बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना.
संगमनेर : तुमची सत्ता आली म्हणून माजले का? असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करून अज्ञात सात ते आठ तरुणांनी तीन जणांना बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना गुरुवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास संगमनेर बस स्थानक परिसरात घडली.
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, विशाल अशोक पराड (राहणार तिरंगा चौक, मालदाड रोड) हे गुरुवारी अकोले तालुक्यातील चिंचवणे येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून एसटी बसने ते संगमनेरला परतले. रात्री १० वाजेच्या सुमारास ते संगमनेर बसस्थानक परिसरात पोहोचले. यानंतर त्यांनी मित्र मनीष अरुण पलघडमल यांना संगमनेर बस स्थानकावर बोलावले. मनीष व प्रतीक अमोलिक हे दोघे विशाल यांना घेण्यासाठी आपली दुचाकी घेऊन संगमनेर बसस्थानक
परिसरात गेले. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ते बसस्थानक परिसरात पोहोचले. त्यांना पाहताच विशाल यांनी त्यांना आवाज दिला. यावेळी बस स्थानकाबाहेरील एका हॉटेलजवळ सात ते आठ तरुण थांबलेले होते. त्यांनी या तरुणांना अडवून आवाज का देता, तुमची सत्ता आली म्हणून माजले का? असे बोलून जातिवाचक शिवीगाळ केली. या तरुणांनी विशाल पराड यांना लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली. ही मारामारी सोडवण्यासाठी गेलेल्या दोघांनाही त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. एकाने खिशातील चाकू काढून तुमचा मुडदा पाडुन टाकील, अशी धमकी दिली. यानंतर जीवाच्या भितीने तिघेजण पळून गेले.
याबाबत विशाल पराड यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात सात ते आठ तरुणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Web Title: Sangamner Caste abuse by saying that
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study