संगमनेर तालुक्यात वर्षअखेर दिवशी २१ करोनाबाधित
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात गुरुवारी २१ करोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्यात करोनाची घौडदौंड सुरूच आहे. शहरात ५ तर ग्रामीण भागातून १६ जण बाधित आढळून आले आहेत.
संगमनेर तालुक्यात प्राप्त झालेल्या अहवालात शहरी भागात कुंभार गल्ली येथे ३२ वर्षीय पुरुष, जनता नगर येथे ३८ वर्षीय महिला, संगमनेर येथे ६५,२३,३२ वर्षीय पुरुष असे ५ जण बाधित आढळून आले आहेत.
तर ग्रामीण भागात झोळे येथे २० व ५० वर्षीय महिला, २८ वर्षीय तरुण, चंदनापुरी येथे २१ वर्षीय तरुण, ४० वर्षीय महिला, मनोली येथे ७० वर्षीय महिला, २५ वर्षीय तरुण, ५७ वर्षीय पुरुष, ४० व २० वर्षीय महिला, जवळे कडलग येथे ५४ वर्षीय पुरुष, राजापूर येथे ३० वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे २६ वर्षीय तरुण, वडगाव पान येथे ३६ वर्षीय पुरुष, अंभोरे येथे १८ वर्षीय तरुणी, निळवंडे येथे ४५ वर्षीय महिला असे १६ जण बाधित आढळून आले आहेत.
Web Title: Sangamner city 5 and rural area 16 corona positive