Home संगमनेर Sangamner: कंत्राटी वीज कर्मचाऱ्याचा शॉक लागून जागीच मृत्यू

Sangamner: कंत्राटी वीज कर्मचाऱ्याचा शॉक लागून जागीच मृत्यू

Sangamner Contract power worker dies on the spot due to shock

संगमनेर | Sangamner: कर्जुले पठार उपकेंद्र या ठिकाणी सोमवारी महावितरणाच्या उपकेंद्रात काम करीत असताना कंत्राटी वीज कर्मचाऱ्याचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोपान भावका कुलाळ वय २९ रा. जवळे बाळेश्वर यांचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे महावितरणाच्या कर्जुले पठार कार्यालयात खळबळ उडाली आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील कर्जुले पठार येथील महावितरण उपकेंद्रात सोमवारी सायंकाळी साडे सहा वाजेच्या दरम्यान सोपान कुलाळ हे नेहमीप्रमाणे काम करीत असताना विजेच्या तारेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला आहे.

महावितरणचे घारगाव शाखा येथील कनिष्ठ अभियंता आशिष अरविंद रणदिवे यांनी घारगाव पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल ए.आर. गांधले हे करीत आहेत.

See:  Latest Entertainment NewsLatest Marathi News, and Latest Marathi News Live

Web Title: Sangamner Contract power worker dies on the spot due to shock

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here