Home संगमनेर Sangamner Coronavirus: संगमनेरात १६४५ बाधित रुग्णांवर उपचार सुरु

Sangamner Coronavirus: संगमनेरात १६४५ बाधित रुग्णांवर उपचार सुरु

Sangamner Coronavirus Active Patient 1645 

संगमनेर | Sangamner Coronavirus: संगमनेर तालुक्यात रुग्णवाढ सुरूच आहे. तालुक्यात चार दिवसांत १५३७ रुग्ण आढळून आले आहेत तर एकूण बाधितांची संख्या २० हजार पार होऊन २१०१३ इतकी झाली आहे. १०१ बाधितांचा मृत्यू झाला आहे.

शनिवारी २५५ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. १८९१६ जणांनी आत्तापर्यंत कोरोनावर मात केली आहे. शहरात ४७२१ तर ग्रामीण भागात १५९४८ रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात चाचण्या वाढविण्यात आल्याने रुग्णाची संख्या वाढत आहे. सध्या तालुक्यात विविध रुग्णालयात १६४५ रुग्ण उपचार घेत आहे. 

खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध असतानाही बेड शिल्लक नसल्याचे बोर्ड लावण्यात आले आहे. रुग्णांची आर्थिक परिस्थिती पाहून बेड उपलब्ध करून दिला जात आहे. याकडे नेमलेल्या पथकाने या गोष्टीकडे पाहण्याची मागणी होत आहे. प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष आहे.

दरम्यान प्रशासन विविध उपाययोजना सुरु करून रुग्ण संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र बाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. प्रशासन कोरोना चाचण्या व लसीवर भर देत आहे.

Web Title: Sangamner Coronavirus Active Patient 1645 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here