Crime, संगमनेर: शिक्षकाने महिलेला मिठी मारून जीवे मारण्याची धमकी
Sangamner Crime | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील खांडगाव परिसरात एका शिक्षकाने स्वयंपाक घरात घुसून मिठी मारल्याचा प्रकार घडला आहे. तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.
बाबाजी बहिरुनाथ गुंजाळ रा. खांडगाव असे या शिक्षकाचे नाव आहे. याबाबत पिडीत महिलेने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून बाबाजी बहिरुनाथ गुंजाळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे एक ४० वर्षीय महिला शेती करून आपले कुटुंबीयांसोबत राहते. पिडीतेचे पती व सासू बाहेर काम असताना शनिवारी रात्री आठ वाजेच्य सुमारास स्वयंपाक करीत असतानाआरोपी शिक्षक अचानक घरात घुसला आणि तिच्याशी लगट करू लागला. बोलणे सुरु असताना त्याने अचानक महिलेला मागील बाजूने मिठी मारली. यामुळे महिला घाबरली. आरडाओरडा केला तिने त्याला विरोध केला असता त्या शिक्षकाने तेथून पळता पाय काढला. जाताना शिक्षकाने महिलेस धमकी दिली की, मी तुला मिठी मारली हा प्रकार कुणास सांगितला तर तुला जीवे मारून टाकीन असे म्हणत निघून गेला. याबाबत महिलेने आपल्या पतीस सांगितले असता दोघांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार बाबाजी बहिरुनाथ गुंजाळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Sangamner Crime eacher hugged the woman and threatened to kill her