Home क्राईम आदिवासी शेतकऱ्याच्या शेततळ्यातील कामाचे पैसे हडपले, फसवणुकीचा गुन्हा दाखल

आदिवासी शेतकऱ्याच्या शेततळ्यातील कामाचे पैसे हडपले, फसवणुकीचा गुन्हा दाखल

Sangamner Crime | संगमनेर: अकोले तालुक्यातील आंबीवंगण येथील एका ६० वर्षीय आदिवासी गरीब शेतकऱ्याच्या शेततळ्याचे अस्तरीकरण करून देण्यासाठी लाखो रुपये घेऊनही गेल्या चार वर्षात काम केले नाही. त्याबाबत वारंवार विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊन शिवीगाळ व दमदाटी करण्याचा प्रकार तसेच जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या संगमनेरमधील अजित काशिनाथ गायकवाड या इसमाविरुद्ध फसवणुकीसह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१७ ते २०२१ या चार वर्षाच्या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अकोले तालुक्यातील आंबीवंगण येथील एका ६० वर्षीय आदिवासी शेतकऱ्याने आपल्या शेतातील शेततळ्यासाठी अकोले कृषी विभागत अर्ज केला होता. सन २०१६ साली तो मंजूर करण्यात आला व त्यानुसार संबंधित शेतकऱ्यास त्याच्या शेतात ७० बाय १०० फुट आकाराचा खड्डा खणून देण्यात आला. यानंतर सदरच्या खड्ड्यात पाणी साठविण्यासाठी त्याचे अस्तरीकरण होण्याची गरज असल्याने संबंधित शेतकऱ्याने अस्तरीकरण काम करण्याचा शोध सुरु केला असता त्यांना संगमनेरातील सहयाद्री विद्यालयासमोरील सर्वज्ञ एन्टरप्रयजेसचा संचालक अजित काशिनाथ गायकवाड हा अस्तरीकरणाचे काम करीत असल्याची माहिती मिळाली. या कामाबाबत गायकवाड यांच्याशी मोबाईलवर चर्चा झाल्याने १७ मार्च २०१७ रोजी त्या शेतकऱ्याला संगमनेर येथे बोलाविले. तेथे जाऊन झालेल्या चर्चेनुसार सदरचे काम १ लाख १० हजार रुपयांमध्ये करण्याचे ठरविले. व त्यापोटी ६० हजार रुपयांची आगाऊ रक्कम धनादेशाद्वारे गायकवाड यांना देण्यात आली. त्यावर एक महिन्यात काम करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र त्यानंतर एक महिना उलटूनही प्रत्यक्ष काम सुरु होत नसल्याने त्या शेतकऱ्याने मोबाईलवर प्रत्यक्ष विचारणा सुरु केली. मात्र त्याची खोटे आश्वासन देत बोळवण करण्यात येत होती. या शेतकऱ्याने अखेर संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांची भेट घेतली. व माहिती देण्यात आल्याने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.   

Web Title: Sangamner Crime Money was squandered on tribal farm work 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here