Home क्राईम संगमनेर तालुक्यात मुन्नाभाई डॉक्टरवर गुन्हा दाखल

संगमनेर तालुक्यात मुन्नाभाई डॉक्टरवर गुन्हा दाखल

Sangamner Crime Munnabhai Doctor files case against doctor

Sangamner Crime | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे आरोग्य सेवेची कोणतीही पदवी नसताना एक बोगस मुन्नाभाई डॉक्टर मागील अनेक वर्षापासून लोकांच्या उपचाराच्या नावाखाली फसवणूक करीत असल्याची माहिती उघडकीस आली होती. मात्र या मुन्नाभाईवर कारवाईचा बडगा उचलला जात नव्हता. अखेर वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांवरून आश्वी पोलीस ठाण्यात शुक्रवारी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून तो मुन्नाभाई पसार झाला आहे.

याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात आश्वी खुर्दचे आरोग्य अधिकारी कोंडाजी मदने यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, पानोडी गावात कोणताही वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना नसताना डॉ. असीम दासहा त्याच्या नावाचा फलक लावून लोकांना डॉक्टर असल्याचे भासवून त्यांची फसवणूक करत होता.

Web Title: Sangamner Crime Munnabhai Doctor files case against doctor

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here