Home Ahmednagar Live News Crime: किरकोळ कारणातून आदिवासी कुटुंबाला मारहाण

Crime: किरकोळ कारणातून आदिवासी कुटुंबाला मारहाण

Sangamner Crime Tribal family beaten for petty reasons

Ahmednagar News Live | Sangamner Crime | संगमनेर: किरकोळ कारणातून आदिवासी कुटुंबाच्या घरी जात फिर्यादी व तिच्या मुलाला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आश्वी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर जातिवाचक शिवीगाळ केल्याने पाच जणांविरोधात आश्वी पोलिस ठाण्यात मारहाण व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा करण्यात आला आहे. 

याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की गुरुवारी (ता. १३) रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांच्या आश्वी बुद्रुक शिवारातील वस्तीवरील घरी येऊन, अनधिकाराने घरात घुसून यातील आरोपींनी फिर्यादी व तिच्या मुलाला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच, मोबाईल आपटून फोडला.

आमच्या नादी लागल्यास बेत पाहू, अशी धमकी दिली. याबाबत आश्वी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याचे समजताच पुन्हा त्यांच्या घरी जाऊन जातिवाचक शिवीगाळ केल्याचे पुरवणी फिर्यादीत म्हंटले आहे. यावरून पोलिसांनी लखन मदने, बंटी मदने, अमोल जगताप, लव्हांडे (पूर्ण नाव माहीत नाही) व एक अनोळखी व्यक्ती (सर्व रा. आश्वी बुद्रुक, ता. संगमनेर) यांच्याविरोधात  गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: Sangamner Crime Tribal family beaten for petty reasons

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here