Home Breaking News संगमनेरात मतदान करतानाचे व्हिडीओ, फोटो व्हायरल; गुन्हा दाखल,  रात्री आठपर्यंत रांगा

संगमनेरात मतदान करतानाचे व्हिडीओ, फोटो व्हायरल; गुन्हा दाखल,  रात्री आठपर्यंत रांगा

Breaking News | Sangamner Election:  किरकोळ बाचाबाची वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. ७२.७५ टक्के मतदान झाले.

Sangamner Election Videos, photos of voting in Sangamner go viral

संगमनेर: संगमनेर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मंगळवारी (दि.०२) मतदानाची प्रक्रिया पार पडली. एकूण १५ प्रभागांत ६० मतदान केंद्र असताना अनेक केंद्रांवर दुपारनंतर गर्दी झालेली पहायला मिळाली. किरकोळ बाचाबाची वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. ७२.७५ टक्के मतदान झाले. मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत होती. त्यानंतर मतदान केंद्रांच्या रांगेत उभे असलेल्या नागरिकांना मतदानाचा करण्याचा हक्क मिळावा यासाठी, निवडणूक प्रशासनाकडून चिठ्ठया देण्यात आल्या होत्या, त्यामुळे काही ठिकाणी रात्री साधारण ७.४५ पर्यंत मतदान सुरू होते.

प्रभाग १ (ब), प्रभाग २ (ब) आणि प्रभाग १५ (ब) वगळून येथीलच प्रभाग १ (अ), प्रभाग २ (अ), प्रभाग १५ (अ) तसेच उर्वरित १२ प्रभागांत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठीच्या उमेदवारांसाठी मतदान झाले. एकूण ५७.७१४ मतदार आहेत. त्यापैकी ४१. ९८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. हे प्रमाण ७२.७५ टक्के इतके आहे.

सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार अगदी अंतिम टप्प्यात आला असतानाच प्रभाग १ (ब), प्रभाग २ (ब) आणि प्रभाग १५ (ब) या तीन ठिकाणी निवडणूक पुढे ढकलली आहे. त्यामुळे तेथे २० डिसेंबरला मतदान होणार आहे. या तीन प्रभागांत नगरसेवक पदांच्या उमेदवारांबाबत न्यायालयात अपील असल्याने मतदान प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.

आमदार सत्यजित तांबे. त्यांच्या पत्नी डॉ. मैथिली आणि तांबे कुटुंबीयांनी एकत्रित येऊन मतदान केले. तसेच अनेक उमेदवारांनीही त्यांच्या प्रभागात मतदानाचा हक्क बजावला. अनूचित प्रकार घडू नये, याकरिता उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण उंडे, तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी धीरज मांजरे, मुख्याधिकारी दयानंद गोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी नियोजन केले होते.

मतदान करतानाचे व्हिडीओ, फोटो व्हायरल; गुन्हा दाखल

मतदान केंद्रात मतदान करतानाचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला होता. या व्हिडिओची लिंक मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली पहायला मिळाली, त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेचे कलम २२३, लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ कलम १२८, १३० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. महिला पोलिस नाईक सुजाता थोरात अधिक तपास करीत आहेत.

Breaking News: Sangamner Election Videos, photos of voting in Sangamner go viral

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here