Home क्राईम संगमनेर: जन्मदात्या बापाचा दोन मुलांनीच केला खून, दोघही अटकेत

संगमनेर: जन्मदात्या बापाचा दोन मुलांनीच केला खून, दोघही अटकेत

Sangamner father was murder by only two children

संगमनेर | Murder: कोरोना संकटामुळे हाताला काम नाही. रोजगार गेला आहे. बेकारी वाढली आहे. या कारणातूनच जन्मदात्या बापाचा खून केल्याची घटना घडली आहे.

काम नसल्याने आई वडिलांना सांभाळायचे कसे असा प्रश्न पडला आहे. जन्मदात्या बापाला कोणी पोसायचे यावरून दोन भावांत वाद झाला. आणि या वादातूनच दोन्ही भावांनी बापच्या डोक्यात टणकदार वस्तूने घाव घातला व जीव गेला नाही म्हणून गळा दाबून खून केला. ही घटना संगमनेर तालुक्यातील चिखली येथे मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी दोन्ही मुलाना शहर पोलिसांनी अटक  केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मयत दशरथ सुखदेव माळी हे मुळचे चिंचोली गुरव येथील रहिवासी आहेत. मात्र पोटापाण्यासाठी ते दोन्ही मुलांसह चिखली येथे वीट भट्टीवर कामाला होते. लॉकडाऊन मुळे मजुरीचे कामे कमी झाले आहेत. स्वतः चे पोट भरता येईना तेथे बापाचा संभाळ कोणी करायचा यावरून मयताचे दोन्ही मुळे रामदास व अमोल माळी यांच्यात मंगळवारी रात्री भांडण झाले.तु बापाला संभाळ, तु संभाळ अशा या भांडणात बाप दशरथ माळी हे मध्ये पडल्याने या दोन्ही मुलांनी बापाच्या डोक्यावर टणकदार वस्तूने प्रहार केला. त्यानंतर जीव गेला नाही म्हणून गळा दाबून खून केला.

या घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी सहकारीसोबत घटनास्थळी धाव घेतली. व दोन्ही मुलांना अटक केली असून दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Web Title: Sangamner father was murder by only two children

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here