संगमनेर: चोरी करताना मृत्यू नव्हे तर बनाव करून खून, चौघांना अटक
Sangamner | संगमनेर: राहुरी तालुक्यातील चिखलठाण येथील योगेश रावसाहेब विघे याचा संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे वीज तारांची चोरी (theft) करताना अपघाती झालेला मृत्यू हा अपघात नसून वाटाघाटीवरून झालेल्या वादातून केलेला खून (Murder) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत संगमनेर तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.
१० दिवसांपूर्वी लोणी पोलिसांना एका इनोव्हा कारचा संशय आल्याने अधिक चौकशी केली असता त्यात असलेल्या तरुणांनी संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरातून जाणार्या उच्चदाब वीजवाहिनीच्या तारांची चोरी करताना स्वतःच्या कंबरेला गुंडाळलेल्या रस्सीचा फास बसून चिखलठाण येथील योगेश विघे हा तरुण मृत झाल्याचे घटना घडली असल्याचे सांगितले.
योगेश यास उपचारासाठी लोणी येथे आणल्याचे सांगितले मात्र, लोणी पोलिसांनी या आरोपींकडून एक इनोव्हा कार व एक मालवाहतूक टेम्पो ताब्यात घेऊन घारगाव पोलीस स्टेशनला माहिती दिली. योगेशचे वडील रावसाहेब विघे यांनी याबाबत फिर्याद दिली असून दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी चार आरोपींविरूद्ध भादंवि. 304 व 379 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठिकठिकाणी वीजवाहक तारा चोरीचा हा गोरखधंदा गेली अनेक वर्षे सुरू होता. हा चोरीचा माल श्रीरामपूर व रामगड येथील गोडाऊनमध्ये उतरवून त्याची विल्हेवाट लावली जाते. सुरुवातीला रामगड येथील एक स्विफ्ट डिझायर गाडीतून तारेची वाहतूक केली जायची. मात्र, अधिक माल मिळू लागल्याने मालवाहतूक टेम्पोचा वापर होऊ लागला. या चोरीच्या व्यवसायामधून श्रीरामपूरच्या संबंधित व्यापार्याने दीड ते दोन कोटी रुपयांची कमाई केली. या व्यापार्यासाठी मयत व आरोपी काम करीत असतानाच यातील विघे याचा संबंधित व्यापार्या बरोबर हिशोब व वाटाघाटीवरून वाद झाला व त्याचा राग येऊन व्यापार्यांचे नातेवाईक आरोपीने योगेश विघे याचा काटा काढून कपोकल्पित घटना पोलिसांना सांगून दोन्ही ठिकाणच्या पोलिसांची मोठी पूर्तता करून मृत्यू अपघाती असल्याचे बनाव दाखविले असल्याची चर्चा होत आहे.
Web Title: Sangamner Four arrested for murder, not death while committing theft