Home क्राईम Fraud: मामानेच भाच्याला घातला ५ लाख ३६ हजाराला गंडा, संगमनेर तालुक्यातील घटना...

Fraud: मामानेच भाच्याला घातला ५ लाख ३६ हजाराला गंडा, संगमनेर तालुक्यातील घटना  

Sangamner Fraud Uncle put his nephew to the tune 

संगमनेर | Fraud: भाच्याला गोड बोलून विश्वास संपादन करून मामानेच ५ लाख ३६ हजारांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. अर्व फोर यु इंप्फ्रा अँड एग्रो लिमिटेड मुबई येथील कंपनी चार वर्षात पैसे दुप्पट करून देते असे सांगत तसेच पैसे मिळाले नाही तर माझी जमीन विकून तुम्हाला पैसे देऊ असे आश्वासन देऊन मामानेच आपल्या सैन्य दलातून निवृत्त झालेल्या भाच्याची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तालुका पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मच्छिंद्र मारुती पानसरे रा. जाखुरी ता. संगमनेर हे जवान १ मे २०१५ रोजी भारतीय सैन्य दलातून निवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर त्यांना काही रक्कम मिळाली. पानसरे यांचे मामा मारुती रखमाजी उंबरकर रा. उंबरी बाळापुर व त्याचा मित्र अर्जुन गणपत आंधळे रा. प्रतापपूर यांनी मच्छिंद्र पानसरे यांच्या घरी येऊन त्यांची भेट घेतली. अर्व फोर यु इंप्फ्रा अँड एग्रो लिमिटेड मुबई येथील कंपनीचे आम्ही काम करतो. या कंपनीत पैसे गुंतवा चार वर्षात तुम्हाला दाम दुप्पट करून देतो. रक्कम दुप्पट न झाल्यास आम्ही जमीन विकून पैसे देऊ असे सांगितले. मामाच्या आग्रहामुळे बोलण्यावर पानसरे यांनी  विश्वास ठेवला. ३१ डिसेंबर २०१४ पासून पानसरे यांनी वेळोवेळी स्वतः च्या व पत्नीच्या नावावर या कंपनीत ५ लाख ३६ हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्याची मुदत संपल्यानंतर पानसरे यांनी आपल्या पैशाची मागणी केली. सहा महिन्यानंतर दामदुप्पट पैसे मिळतील असे सांगण्यात आले.

सहा महिन्यानंतरही रक्कम न मिळाल्याने पानसरे यांनी संगमनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून मामा मारुती रखमाजी उंबरकर व अर्जुन गणपत आंधळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या दोघांना अटक केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप हे करीत आहे.

Web Title: Sangamner Fraud Uncle put his nephew to the tune 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here