संगमनेर: विहिरीत पडलेल्या बिबटयाला मिळाले जीवदान
संगमनेर: विहिरीत पडलेल्या बिबटयाला मिळाले जीवदान
संगमनेर : तालुक्यातील सावरगावतळ येथे गावातील मांडवदार परिसरातील विहीरीत पडलेल्या बिबटयाला बाहेर काढण्यात वनविभागाला यश मिळाले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी कि, सावरगावतळ येथील कुंडलिक दादाभाऊ दुधवडे यांच्या मालकीची सामुहिक ७० फुट खोल विहीर आहे. जवळच सोमनाथ शंकर दुधवडे यांचा मेंढयाचा वाडा आहे. त्यामुळे भक्ष्याच्या शिकारीच्या शोधात बिबटया या परिसरात आला होता. जवळच असलेल्या विहिरीत गुरुवारी रात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास ५ वर्ष वयाचा नर जातीचा बिबटया आणि मादी हे भक्ष्याचा शोधत असतांना त्यातील नर जातीचा बिबटया विहिरीत पडला.
You May Also Like: Deepika Padukone Ranveer Singh Marriage Date
सकाळी कुंडलिक हे विहिरीवर आपली पंप मोटार चालु करण्यास गेले असता त्यांना विहिरीतुन बिबटयाच्या डरकाळीचा आवाज आला. त्यांनी विहिरीत डोकावुन पाहिले असता त्यांना विहिरीत बिबटया आढळले. त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती गावचे पोलिस पाटील गोरक्ष नेहे यांना दिली. पोलिस पाटील गोरक्ष नेहे यांनी याबाबत वनविभागास माहिती कळविली. माहिती समजताच वनपाल आर. बी. माने, वनरक्षक सुभाष अडांगळे यांनी वनविभागाच्या वतीने विहिरीत पिंजरा सोडून बिबटयास सुखरुप विहिरीतुन काढण्याकरिता गावचे पोलिस पाटील गोरक्ष नेहे, उपसरपंच शिवनाथ नेहे, तंटामुक्ती अध्यक्ष परशराम नेहे , संयुक्त वनकमिटी अध्यक्ष दशरथ गाडे यांचे सह ग्रामस्थांनी सहकार्य केले.
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.