संगमनेर: परवानाधारकास शिवीगाळ व मुलास मारहाण
घारगाव | Sangamner: मातीमिश्रीत वाळू परवान्याची मुदत संपल्यानंतर वाळू उपसा बंद होण्याकरिता परवानाधारकाने तहसीलदारांना अर्ज केला होता. त्यावरून परवानाधारकाला शिवीगाळ करीत त्याच्या मुलाला मारहाण केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे मंगळवारी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास घडली.
याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी निलेश शांताराम सुपेकर रा. नांदूर ता. संगमनेर यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी अण्णा वाडगे रा. घारगाव व अनोळखी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शांताराम सुपेकर यांनी त्यांच्या नावावर मातीमिश्रित वाळूचा परवाना घेतला होता. त्या परवान्याची मुदत संपल्याने तो बंद होण्यासाठी त्यानी संगमनेरच्या तहसीलदारांना अर्ज केला होता. या कारणातून अण्णा वाडगे याने शांताराम सुपेकर यांना फोनवरून शिवीगाळ केली. तसेच त्यांचा मुलगा निलेश सुपेकर हा चार चाकी दुरस्थीसाठी घारगावात गेला असता वाडगे व अन्य तीन जणानी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
येथे पहा: हार्दिक पांड्याची बॅटिंग १ ओव्हर ६ ६ ६ ६ ४ १, हेलिकॉप्टर शॉट
Web Title: Sangamner Insulting the licensee and beating the child