संगमनेर खुर्द येथे महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून कुऱ्हाडीने वार
संगमनेर | Sangamner Khurd: संगमनेर खुर्द येथील सिद्धकला हॉस्पिटलसमोर एका महिलेस जातीवाचक शिवीगाळ करत तिच्यावर कुऱ्हाडीने वार करण्याची घटना शनिवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास घडली. या युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
नंदू वाल्मिक गांजवे वय २५ रा. संगमनेर खुर्द असे या कृहाडीने वार करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याविरोधात मारहाण झालेल्या महिलेच्या मुलाने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे,
या महिलेचे सिद्धकला हॉस्पिटलसमोर घर आहे तेथेच शेजारी नंदू गांजवे याचेही घर आहे. गांजवे याने दारूच्या नशेत या महिलेला जातीवाचक शिवीगाळ केली. हातापायावर कुऱ्हाडीने वार केल्याचे फिर्यादीत सांगितले आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, and Latest Marathi News
Web Title: Sangamner Khurd woman was racially abused and attacked with an ax