Home संगमनेर संगमनेरचे आ. अमोल खताळ यांची विधानसभेत प्रमुख मागण्या

संगमनेरचे आ. अमोल खताळ यांची विधानसभेत प्रमुख मागण्या

Breaking News | Sangamner: संगमनेरला उपसा सिंचन योजना आणि रस्ते विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. (Amol Khatal in the Legislative Assembly)

Sangamner Major demands of Amol Khatal in the Legislative Assembly

संगमनेर :  संगमनेर तालुक्‍यातील साकुर पठार भागाला उपसा सिंचन योजनेच्‍या  माध्‍य मातून पाणी पुरवठा करण्‍यासाठी तसेच रस्‍ते विकासासाठी निधी उपलब्‍ध करुन द्यावा आणि पर्यटन धोरणातून तालुक्‍या तील रोजगार निर्मितीसाठी चालना द्यावी अशी मागणी संगमनेर विधानसभेचे महा युतीचे आ अमोल खताळ यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात विधानसभेत केली. तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्‍यासाठी नेमलेल्‍या समि तीचे अध्‍यक्ष संगमनेर तालुक्‍याचे भूमिपुत्र प्रा. डॉ रंगनाथ पठारे यांच्‍या योगदानाचा ही त्‍यांनी आपल्‍या भाषणात आवर्जुन उल्‍लेख केला.

  नागपुर येथील विधानसभेच्या हिवाळी आधिवेशात राज्‍यपालांच्‍या अभिभाषणा वर बोलताना आ.अमोल खताळ पाटील यांनी राज्‍यातील महायुती सरकारने विविध योजनांच्‍या माध्‍यमातून समाज घटकांचा योग्‍य सन्‍मान केल्‍यामुळेच सरकारला मोठे यश मिळाले असल्‍याचे सांगितले. या सरकारने महात्‍मा फुले आरोग्‍य जीवनदायी योजनेचा निधी वाढविल्‍या बद्दल तसेच सिमा भागातील ८६५गावांमध्‍ये ही योजना लागु करण्‍याचा निर्णय घेतल्‍याबद्दल त्‍यांनीराज्यसरकारचे अभिनंदन केले.शिवसेनाप्रमुख बाळा साहेब ठाकरे ग्रामपंचायत बांधणी योजना , सौरउर्जेचे धोरण, दूग्‍ध विकास टप्‍पा दोन या माध्‍यमातून शेतक-यांना दिलासा देण्‍याचे काम होत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या माध्‍यमातून ७हजार ४८०कि मी च्‍या रस्‍ते विकासाची कामे सरकारने हाती घेतली आहेत.  संगमनेर तालुक्‍यातील रस्‍त्‍यांच्‍या विकासालाही निधीची उपलब्‍धताही करुन द्यावी अशी मागणी त्‍यांनी आपल्‍या भाषणात केली.

राज्‍यात जलजीवन योजनेची कामे सुरु आहेत. मात्र  तालुक्‍यातील कामांचा दर्जा निकृष्‍ट असल्‍याने त्‍याचे सरकारने गांभिर्य घ्‍यावे. पेमगिरी येथील सात एकर परिसरात असलेले वडाचे झाड आणि या‍ परिसराचा पर्यटन धोरण २०२४ मध्‍ये समावेश करुन या झाडाचे संवर्धन तसेच पर्यटन विकासातून रोजगार निर्मिती करण्‍याची मागणी आ अमोल खताळ यांनी केली.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्‍याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्‍यक्‍त करुन, या निर्णयामुळे जगातील ४५० विद्यापीठांमध्‍ये आता मराठी भाषेचा अभ्‍यास सुरु होईल. अभिजात दर्जा मिळावा म्‍हणून, स्‍थापन केलेल्‍या समितीचे अध्‍यक्ष पद हेआमच्‍या  तालुक्‍याचे भूमीपुत्र प्रा.रंगनाथ पठारे यांच्‍याकडे होते. त्‍यामुळे त्‍यांनी दिलेल्‍या योगदानाचा निश्चितच आम्‍हाला अभिमान असल्‍याचा आवर्जुन उल्‍लेख आ.अमोल खताळ यांनी आपल्‍या भाषणात केला.

Web Title: Sangamner Major demands of Amol Khatal in the Legislative Assembly

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here