Home संगमनेर संगमनेरच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलगी गर्भवती

संगमनेरच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलगी गर्भवती

Breaking News | Sangamner: एका अल्पवयीन मुलीवर नगरमध्ये वारंवार अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिल्याची घटना.

Sangamner minor girl assaulted, girl pregnant

अहमदनगर:  संगमनेर येथील एका अल्पवयीन मुलीवर नगरमध्ये वारंवार अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने शनिवारी (3 ऑगस्ट) रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तरुणाविरूध्द अत्याचार, पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृष्णा राजू पवार (रा. वडगाव गुप्ता रस्त्यावरील आठरे पाटील शाळेजवळ, नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याने फिर्यादी अल्पवयीन मुलीवर 9 मार्च 2024 रोजी दुपारच्या वेळी व 27 जुलै 2024 रोजी सावेडी उपनगरातील एका बांधकामाच्या ठिकाणी अत्याचार केला. दरम्यान, यामुळे पीडिता गर्भवती राहिली आहे. सदरचा प्रकार पीडितेच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शनिवारी रात्री तोफखाना पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.

घटनास्थळी शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, प्रभारी निरीक्षक प्रताप दराडे, सहायक निरीक्षक जे. सी. मुजावर, महिला उपनिरीक्षक शुभांगी मोरे यांनी भेट दिली. पीडितेच्या फिर्यादीवरून शनिवारी रात्री उशिरा संशयित आरोपी कृष्णा पवार विरोधात अत्याचार, पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मुजावर करत आहेत.

Web Title: Sangamner minor girl assaulted, girl pregnant

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here