Home संगमनेर संगमनेर: अज्ञात इसमाचा निर्घृण खून

संगमनेर: अज्ञात इसमाचा निर्घृण खून

Breaking News | Sangamner Cime: गुंजाळवाडी परिसरात अज्ञात इसमाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली.

Sangamner murder of unknown person

संगमनेर: संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अज्ञात इसमाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली आहे. खून झालेल्या इसमाची ओळख पटू नये यासाठी त्याच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल

केला आहे. गुंजाळवाडी परिसरामध्ये पुणे-नाशिक महामार्गावरील पुलाखालील मंगळवारी सायंकाळी अंदाजे ५० ते ६० वयोगटातील व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या व्यक्तीचे गुप्तांग, चेहरा संपूर्ण जळालेला अवस्थेत होता. त्याची ओळख पटू नये म्हणून त्याच्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून खून केला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. कामगार पोलीस पाटील गणेश म्हस्के यांना या घटनेची माहिती समजतात त्यांनी शहर पोलिसांना ही माहिती कळवली. माहिती समजताच शहर पोलीस त्वरित घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे. खून झालेल्या व्यक्तीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत असून चेहरा पूर्ण जळून खाक झाला आहे. याबाबत पोलीस पाटील गणेश म्हस्के यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे करीत आहे. दरम्यान, खून झालेल्या व्यक्तीच्या अंगावर फक्त अर्धी विजार, गळ्यात रुद्राक्षाची माळ, उजव्या हातामध्ये मणी असलेला धागा बांधलेला आहे. बांधा सडपातळ दिसत असून उंची साधारण १६५ सेंटीमीटर आहे. जर या व्यक्तीस कोणी ओळखत असेल तर त्यांनी संगमनेर शहर पोलिसांनी संपर्क करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी केले आहे.

Web Title: Sangamner murder of unknown person

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here