संगमनेर तालुक्यात एटीम मशीन फोडून पावणे दोन लाख रुपये लंपास
संगमनेर | Sangamner News: संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे असलेले टाटा इंडीकॅशचे एटीम रात्रीच्या वेळी फोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ७२ हजार ५०० रुपयांची रोकड लंपास केली आहे.
शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी शनिवारी रात्री अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तळेगाव दिघे येथे लोणी ते नांदूर शिंगोटे रस्त्यावर टाटा इंडीकॅशचे एटीम रात्रीच्या सुमारास गॅस कटरच्या सहायाने फोडले. सीसीटीव्ही केबल तोडून टाकण्यात आली. एटीममधून १ लाख ७२ हजार ५०० रुपये लंपास करण्यात आले. विजय केशव थेटे याच्या अखत्यारीत हे इंडीकॅशचे एटीम असल्याने शनिवारी सकाळी त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. संगमनेर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून पथकाने तपास सुरु केला आहे. याप्रकरणी विजय थेटे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Sangamner News ATM Theft