Home Sangamner News Crime | संगमनेर: नमाज पठणाच्या वेळेवरून एकास चाकूने वार करीत मारहाण

Crime | संगमनेर: नमाज पठणाच्या वेळेवरून एकास चाकूने वार करीत मारहाण

Sangamner One was stabbed and beaten from the time of Namaz

संगमनेर | Sangamner Crime: दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एकास तुला वाटेल तेव्हा तू नमाजाची वेळ का ठेवतो? असे म्हणत लोखंडी टामी आणि चाकूने वार करीत जखमी केल्याची घटना शनिवारी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास पुना नाक्याजवळ नाईकवाडपुरा येथे घडली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

मोसिन नासीरखान पठाण वय ४० रा. नाईकवाडपुरा याने फिर्याद दिली आहे. यावरून साजिद मेहमूद शेख रा. रहेमतनगर व मजहर मेहबूब पठाण रा. नाईकवाडपुरा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोसिन पठाण हे पुणे नाक्यावरील एका मोबाईल शॉपीमध्ये होते. यावेळी दुचाकीवरून साजिद व मजहर आले. या दोघांनी मोसिन यास दमबाजी करीत शिवीगाळ केली. मोसिन यांनी यावेळी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र त्या दोघांनी लोखंडी टामीने मारहाण करीत चाकूने वार करीत जखमी केले. आसपासच्या नागरिकांनी मध्यस्थी करत जखमी मोसिन यास एका खासगी रुग्णालयात दाखल केले. याबाबत पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जखमीचा जबाब नोंदविला आहे. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलीस अधिक तपास करीत आहे.

Web Title: Sangamner One was stabbed and beaten from the time of Namaz

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here