Home संगमनेर संगमनेर: विजेचा धक्का बसून पोलीस पाटील यांचा मृत्यू

संगमनेर: विजेचा धक्का बसून पोलीस पाटील यांचा मृत्यू

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील शिवापूर कोकणगाव शिवारात शेतातील वांगी पिकावर फवारणी करीत असताना विजेचा मुलाला विजेचा धक्का बसल्याने त्याला वाचविण्यासाठी धावलेल्या पित्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.

सुभाष जयवंत पारधी असे पित्याचे नाव आहे ते शिवापुरचे पोलीस पाटील होते. ही घटना शनिवार दिनांक २७ जुलै रोजी सकाळी ९:३० च्या सुमारास घडली.

कोकणगाव शिवापूर शिवारात मुलगा प्रवीण सुभाष पारधी हा शेतातील वांगी वांगी पिकावर फवारणी करीत असताना शेतात पसरविल्या इलेक्ट्रिक केबलला प्रवीण पारधी याचा स्पर्श झाल्याने त्यास विजेचा धक्का बसला व तो ओरडला त्याचवेळी वडील सुभाष जयवंत पारधी हे मुलास वाचविण्यासाठी गेले असता मुलास हाताने ओढून बाजूला करत त्यांना विजेचा धक्का बसल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. मात्र अगोदरच त्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेने शिवापूर परिसरात शोककळा पसरली आहे. संगमनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Sangamner Police Patil dies due to electric shock

Get the latest  Sangamner News, Akole News, Ahmednagar News, Maharashtra News from Crime, Political, Accident, Entertainment, Social News from all Cities of Maharashtra.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here