Home Sangamner News Sangamner: संगमनेर तालुक्यात २६ जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह

Sangamner: संगमनेर तालुक्यात २६ जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह

SHARE

Sangamner Taluka 26 corona positive

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात काल शुक्रवारी प्राप्त अहवालात 26 जण करोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या 2,528 इतकी झाली आहे.

शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरात जनतानगर येथे 45 वर्षीय महिला, मालदाड रोड येथे 23 वर्षीय तरुणी व 4 वर्षीय बालिका करोनाबाधित आढळून आली आहे. तालुक्यात जोर्वे येथे 40 वर्षीय पुरुष, वेल्हाळे येथे 36 वर्षीय पुरुष, 34,30 वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथे 55 वर्षीय पुरुष,  निमगाव बुद्रुक येथे 64 वर्षीय पुरुष, सुकेवाडी येथे 70 वर्षीय पुरुष, पोखरी हवेली येथे 62 वर्षीय महिला, ओझर खुर्द येथे 55,50 वर्षीय महिला, 8  वर्षीय बालिका, निमोण येथे २० वर्षीय तरुण, घुलेवाडी येथे 50 वर्षीय पुरुष,  27 वर्षीय तरुण, पळसखेड येथे 31 वर्षीय पुरुष, मालदाड येथे 50 वर्षीय महिला, कौठे बुद्रुक येथे 46 वर्षीय पुरुष, चंदनापुरी येथे 66 वर्षीय पुरुष, सावरगाव तळ येथे  65 वर्षीय दोन महिला, 37 वर्षीय पुरुष, 13 वर्षीय बालिका बाधित आढळून आले आहेत. यामुळे तालुक्याची एकूण करोना बाधितांची संख्या 2,528 वर पोहोचली आहे.

See:  Latest Entertainment NewsLatest Marathi News, and Latest Marathi News Live

Web Title: Sangamner Taluka 26 corona positive