Home Sangamner News Sangamner: संगमनेर तालुक्यात ५० करोनाबाधितांची वाढ

Sangamner: संगमनेर तालुक्यात ५० करोनाबाधितांची वाढ

SHARE

Sangamner Taluka 50 corona infected

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात शनिवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 50 करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या 2,638 इतकी झाली आहे.  

शनिवारी सायंकाळी प्राप्त अहवालातून मालदाड रोड येथील 50 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय महिला, 20 वर्षीय तरुण, महात्मा फुलेनगर मधील येथील 70 वर्षीय पुरुष, 63 वर्षीय महिला, गणेशनगर येथील 58 वर्षीय पुरुष,  मदिनानगर येथील 41 वर्षीय तरुण पुरुष व रंगारगल्ली येथील 50 वर्षीय महिला, 35 वर्षीय पुरुष करोनाबाधित आढळून आला आहे.

तर तालुक्यात रहिमपूर येथे 43 वर्षीय पुरुष,  मंगळापुर येथे 44 वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, 27 वर्षीय तरुण, वडगाव लांडगा येथे 55 वर्षीय इसम पुरुष, घारगाव येथील 54 वर्षीय महिला, 52 वर्षीय पुरुष,  माळेगाव हवेली येथे 50 वर्षीय इसम पुरुष, पिंपळे येथे 70 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे  56,54,52 वर्षीय पुरुष,  कोठे बुद्रुक येथे 43 वर्षीय महिला,  वनकुटे येथे 58 ,33 वर्षीय महिला, 16,10,10 वर्षीय बालिका, 60 वर्षीय पुरुष व 34 वर्षीय तरुणासह पुरुष, 2 वर्षीय बालक, वेल्हाळे येथे १९ वर्षीय तरुण, झोळे येथे 85 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय महिला, पानोडी गावात 40 वर्षीय महिला, खळी येथे 50 वर्षीय पुरुष, निमगाव पागा येथे 62,34 वर्षीय महिला,  चिंचपूर येथे  61 वर्षीय पुरुष, लोहारा येथे 35 वर्षीय महिला, देवकौठे येथे 66,50 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, तळेगाव दिघे येथे 50 वर्षीय महिला, वडगावपान येथील 68,51 वर्षीय पुरुष व रायतेवाडी येथील 45 वर्षीय तरुणाला पुरुष असे करोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या 2,638 वर पोहोचली आहे.

See:  Latest Entertainment NewsLatest Marathi News, and Latest Marathi News Live

Web Title: Sangamner Taluka 50 corona infected