Home Ahmednagar Live News संगमनेरातील धक्कादायक घटना: वडील व मुलीने गळफास घेत आत्महत्या

संगमनेरातील धक्कादायक घटना: वडील व मुलीने गळफास घेत आत्महत्या

Sangamner taluka Father and daughter commit suicide by hanging 

Ahmednagar News Live | Sangamner Suicide Case | संगमनेर: तालुक्यातील उंबरी बाळापुर येथे शेतातील घरात वडील व मुलीने शनिवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.  

नामदेव बबन भुतांबरे (वय 40) व मनिषा नामदेव भुतांबरे (वय 14) रा. नादूंर खंदरमाळ तरसेवाडी, ता. संगमनेर, हल्ली रा. बाळापूर या बाप लेकीने आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की,  भुतांबरे कुटुंब हे कामानिमित्त उंबरी बाळापूर येथे आले होते. शनिवारी दुपारी बाळापूर शिवारातील पढंरीनाथ दत्तू सातपुते यांच्या गट नंबर – 170 मधील घरामध्ये नामदेव भुतांबरे व मनिषा भुतांबरे या दोघांनी तारेच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. वडील व मुलीने आत्महत्या का केली यामागचे कारण अस्पष्ट आहे. याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत बाळापूरच्या कामगार पोलीस पाटील वैशाली मैड यांनी आश्वी पोलिसांना खबर दिली. यानंतर पोलीस निरीक्षक सुभाष भोये व त्याच्या सहकार्‍यानी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी संगमनेर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शिदें हे करत आहेत.

Web Title: Sangamner taluka Father and daughter commit suicide by hanging 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here