संगमनेर तालुक्यात एकाच दिवशी 86 करोनाबाधीत वाढले
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात शुक्रवारी 72 रुग्ण आढळून आल्यानंतर शनिवारी पुन्हा 86 रुग्ण वाढले आहे. त्यामुळे तालुक्याची चिंता वाढली आहे. तालुक्याने तीन हजारांचा टप्पा पार केला आहे.
शनिवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात शिवाजीनगर येथे 26 वर्षीय तरुण, साईनगर येथील 65 वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथे 45 वर्षीय महिला, 23,21 वर्षीय पुरुष, साळीवाडा येथे 38 वर्षीय महिला नवीन नगर रोडवर 16 वर्षीय मुलगा, गोविंदनगर येथे 70 वर्षीय पुरुष, संगमनगर येथे 53, 44 वर्षीय महिला, 48,26 वर्षीय पुरुष पॉझिटिव आढळून आले आहेत.
तर तालुक्यात राजापूर मधील 50 वर्षीय महिला, हंगेवाडी येथे 47 वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी येथील 45, 20, 16 वर्षीय पुरुष, वाडीतील 65, 45 वर्षीय महिला, 48, 50 वर्षीय पुरुष, 11 वर्षीय बालिका, 15 वर्षीय मुलगा, वरवंडी येथे 53 वर्षे पुरुष, निमगाव बुद्रुक येथे 35 वर्षीय पुरुष, निमगाव टेंभी येथे 48 वर्षीय पुरुष, नांदुरी दुमाला येथे 40 वर्षीय पुरुष, सांगवी येथील 26, 18, 13 वर्षीय पुरुष, 19 वर्षीय तरुणी, आंबी दुमाला येथे 52 वर्षीय पुरुष, कवठे बुद्रुक येथे 70, 42, 40 वर्षीय महिला, 47, 45, 33 , 23 वर्षीय पुरुष, नांदूर येथे 33 वर्षीय पुरुष, घारगाव येथील 34 , 25 वर्षीय पुरुष, 1 वर्षीय बालक, चंदनापुरी येथे 75 वर्षीय महिला, चिखली येथे 81 वर्षीय पुरुष, 75 वर्षीय महिला, 44 वर्षीय पुरुष, राजापूर येथे 21,18 वर्षीय पुरुष, चिंचपूर येथे 55, 34, 30 वर्षीय महिला, 37 वर्षीय पुरुष, 11 वर्षीय मुलगा, प्रतापपुर येथे 60, 60 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, सुकेवाडी येथे 48 ,24 वर्षीय पुरुष , 40 वर्षीय महिला, निमोण येथे 47 वर्षीय पुरुष, देवकवठे येथील 49 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय तरुण, तीगाव येथे 32 वर्षीय पुरुष, तळेगाव येथील 10 वर्षीय मुलगा, निमगाव जाळी मधील 52 वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथील ४० वर्षीय महिला, चिखली येथील 44 वर्षीय पुरुष, हिवरगाव पावसा मधील 50 वर्षीय पुरुष, घुलेवाडी मधील ११ वर्षीय बालक, कवठे बुद्रुक येथील ६० वर्षीय पुरुष, पळसखेड येथे 26 वर्षीय तरुण, सायखिंडी येथे 65 वर्षीय महिला, कनोली मधील 42 वर्षीय पुरुष, पिंपरी येथील 40 वर्षीय महिला, 15 वर्षीय मुलगा, 14 वर्षीय मुलगी आणि 54 वर्षीय पुरुष, हंगेवाडी येथे 65 वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथील 33 वर्षीय पुरुष, चिकणी येथे 64 वर्षीय पुरुष, आश्वी खुर्द येथील 61 वर्षीय पुरुष, घुलेवाडी मधील 38 वर्षीय पुरुष, रायतेवाडी येथील 36 वर्षीय पुरुष असे 86 पॉझिटिव्ह आढळून आल्याने तालुक्याची एकूण संख्या 3,042 इतकी झाली आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, and Latest Marathi News
Web Title: Sangamner taluka Three Thousand corona infected