संगमनेर तालुक्यात अवैध गांजाविक्री, एक तरुण अटकेत
Breaking News | Sangamner Crime: खांडगाव परिसरामध्ये अवैध गांजाची विक्री करणाऱ्या तरुणास अटक केली त्याच्याकडून ७ हजार ६५० रुपयांचा गांजा जप्त.
संगमनेर तालुक्यातील खांडगाव परिसरामध्ये अवैध गांजाची विक्री करणाऱ्या तरुणास पोलिसांनी रविवार ११ मे रोजी सायंकाळी सात वाजता अटक केली आहे. त्याच्याकडून ७ हजार ६५० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खांडगाव शिवारात आरगडे वस्ती समोरील डोंगराच्या बाजुस काटवनात एक इसम गांजाची चोरट्या पद्धतीने विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना समजली. पोलीस पथकाने या ठिकाणी जाऊन पाहणी केले असता, पोलिसांना या ठिकाणच्या काटवन परिसरात एक तरुण बसलेला दिसला. त्याच्याकडे विचारपुस केली असता, त्याच्या ताब्यात गांजाची पिशवी आढळली. त्या पिशवीमध्ये ८५० ग्रॅम वजनाचा गांजा ठेवलेला होता.
पोलिसांनी पंचनामा करून हा गांजा ताब्यात घेतला. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अजित कुन्हे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून पोलिसांनी मोहन ज्ञानेश्वर आरगडे (वय २७, रा. आरगडे मळा, खांडगाव) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संगमनेरातील अवैध धंद्याविरोधात येथील लोकप्रतिनिधी व विविध संघटनांना आवाज उठवत कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे पोलीसांकडून कारवाईला वेग आला आहे.
Breaking News: Sangamner Talukyat Illegal Ganja Sale, A Young arrested