संगमनेरात नाशिक पुणे महामार्ग टोलनाक्यावर समाजवादी जनपरिषदेचे आंदोलन
संगमनेर | Sangamner: नाशिक पुणे महामार्गावरील तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोलनाक्यावर केंद्रीय कृषी व कामगार विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी समाजवादी जनपरिषद यांच्यावतीने आंदोलन करण्यात आले. तसेच संगमनेर तालुका अंगणवाडी कर्मचारी सभा यांनीही हे अन्याय करणारे कायदे रद्द करण्यासाठी आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पार्टी, वैद्यकीय प्रतिनिधी संघटना, अखिल भारतीय किसान सभा संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
हिवरगाव पावसा टोलनाक्यावर महामार्गावर अंगणवाडी कर्मचारी रस्ता अडवून बसून जोरदार घोषणबाजी करत आंदोलन करण्यात आले.
यावेळी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यात आला, केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा व अन्याय करणारे विधेयके रद्द करा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. निशा शिवूरकर अंगणवाडी कर्मचारी सभेच्या प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी ज्ञानदेव सहाणे, अनिल कढणे, अनिल गुंजाळ, ज्ञानदेव राक्षे आदी प्रमुख उपस्थित होते.
Web Title: Sangamner Tollnaka Samajwadi Jan Parishad agitation on Nashik-Pune highway