Home Sangamner News संगमनेर: प्रवरा नदीपात्रात दोन मृतदेह सापडल्याने खळबळ

संगमनेर: प्रवरा नदीपात्रात दोन मृतदेह सापडल्याने खळबळ

Sangamner: प्रवरा नदीजवळ मोठ्या पुलाजवळ दोन मृतदेह (dead bodies )आढळून आल्याने खळबळ, एकाची ओळख पटली तर दुसऱ्याची अद्याप ओळख पटलेली नाही.

Sangamner two dead bodies were found in Pravara riverbed

संगमनेर: संगमनेरमधून वाहणाऱ्या अमृतवाहिनी प्रवरा नदीमध्ये मोठ्या पुलाजवळ काही अंतरावर शुक्रवारी सकाळी दोन मृतदेह आढळून आले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हे मृत्यू नेमके कशामुळे झाले याचा शोध घेण्याचे आव्हान शहर पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

शुक्रवारी सकाळी प्रवरा नदीपात्रातील मोठ्या पुलाखाली आणि तेथून काही अंतरावर असलेल्या फादरवाडी जवळ नदीपात्रात दोन पुरुषांचा मृतदेह आढळून आला शहर पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन मृतदेह नदीपात्रातून काढत शवविच्छेदनासाठी नगरपालिकेच्या विच्छेदन गृहामध्ये आणले होते.

दरम्यान दोन मृतदेहापैकी एकाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले असून हा मृतदेह शहरातीलच मोगलपुरा पुणे नाका येथील अमोल अण्णासाहेब आव्हाड याचा असल्याचे स्पष्ट झाले आव्हाड बेपत्ता झाल्या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती.

तर दुसऱ्या मृतदेहाची ओळख पटली नसून साधारणता 35 वर्षे वयोगटातील हा तरुण आहे. यासंदर्भात अधिक माहिती असल्यास शहर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

एका मृतदेहाची ओळख पटली असली तरी दुसऱ्या हृदयाची ओळख पटविण्याचे काम सुरू असून या दोघांचाही मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा उलगडा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर होणार आहे. दोन्ही मृता संदर्भात शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली.

Web Title: Sangamner two dead bodies were found in Pravara riverbed

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here