Home Accident News Accident: संगमनेर, पुणे नाशिक महामार्गावर दुचाकी व बसचा अपघात

Accident: संगमनेर, पुणे नाशिक महामार्गावर दुचाकी व बसचा अपघात

Sangamner Two-wheeler and bus accident on Pune-Nashik highway

संगमनेर | Accident: पुणे नाशिक महामार्गावरील दुभाजक ओलांडण्याच्या प्रयत्नात दुचाकी व एसटी बसच्या झालेल्या धडकेत तीन जण जखमी झाले आहे. जखमींना आळे फाटा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात बोटा शिवारातील बोटा बायपासजवळ बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार देवराम दुधवडे, शंकर दुधवडे, सुरेश खंडागळे रा. खंदरमाळवाडी हे दुचाकीवरून एम.एच. १४ बीबी ५८०८ बोटा बायपासमार्गे दुभाजक ओलांडून गावात येण्याच्या प्रयत्नात होते. यावेळी पंचवटी आगाराची नाशिक पुणे बस एम.एच.०६ एस. ८२८८ समोरून येत असताना एकमेकांना अंदाज न आल्याने दुचाकी व बसची धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील तिघे जण जखमी झाले. त्यांना आळे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: Sangamner Two-wheeler and bus accident on Pune-Nashik highway

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here